Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी “समर्पणाचीअक्षरगाथा” स्मरणीकेचे प्रकाशन 

वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी “समर्पणाचीअक्षरगाथा” स्मरणीकेचे प्रकाशन 

32

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.1जून):- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पत्नी स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कराड व वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने “स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी विशेषांक (समर्पणाची अक्षरगाथा)” प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून मा. श्रीमती सरोज (माई) नारायण पाटील, (जनरल सेक्रेटरी,महात्मा फुले शिक्षण संस्था, उरूण ईश्वरपूर ) यांच्या शुभहस्ते स्व. सौ. वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की , “वेणूताई ह्या यशवंतराव चव्हाण या ध्येयवेड्या माणसाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या.

शांत, सोज्वळ, निरागस व सालस अशा वेणूताईच्या गुणांचे आपण कौतुक केले पाहिजे. निर्भीड, ध्येयवादी माणसाच्या सहवासात महिलांचे जीवन हे प्रचंड काट्याकुट्याचे असते. अशा माणसाशी संसार करणेसुद्धा वादळसारखे असते. अशा माणसांची तत्वे घट्ट असतात पण पत्नी होरपळून जाते. वेणूताई ह्या अतिशय संयमी होत्या. ध्येयवादी लोकांच्या पत्नी किती बुद्धिमान असतात याचे उदा. म्हणजे वेणूताई होय.

         एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना माईंनी जी. डी. बापू लाड, गणपतरावं देशमुख व साने गुरुजींच्या सहवासाने आम्हास प्रेरणा मिळाल्याचे मान्य केले.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळासाहेब पाटील, चेअरमन, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराड तसेच मा. सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री, सातारा जिल्हा हे होते. आपल्या मनोगतात म्हणाले की वेणूताईंच्या जन्मशताब्दीमुळे वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रम घेतले. वेणूताईबद्दल निवडक लेख मिळवले व आज हा अंक तयार झाला. त्याचाच आज प्रकाशन समारंभ संपन्न झाला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ट्रस्टच्या हॉलमध्ये भावगीत व नाट्यगीत व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून 1 जूनला आपण ट्रस्टच्या हॉलमध्ये गायनाचा कार्यक्रम घेत असतो.

      या कार्यक्रमास श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला तसेच विश्वस्त व सदस्य मा. श्री. अरुण पाटील (काका) मा. श्री. नंदकुमार बटाणे, मा. श्री. भास्करराव कुलकर्णी, मा. मा. श्री. जयंत पाटील (काका ), मा. श्री. संजय बदियानी, श्री. प्रकाश पाटील (बापू ) मा. श्री. दादासाहेब सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

     सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ.आर. आर. जाधव यांनी केले. संपादकीय मनोगत डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रो. डॉ. एम. ए. शिंदे यांनी करुन दिला. प्रो. डॉ. आर. एस. पाटील यांनी मानले. तसेच प्रा. श्रीमती टी. ए. पाटील व डॉ. श्रीमती एन. एस. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशन समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. एच. बुरुंगले, उपप्रचार्य, पर्यवेक्षक, माजी प्राचार्य श्री. बी. एन. कालेकर, डॉ. प्रभाकर पवार, डॉ. आर. ए. केंगार, पोतदार, मा. हणमंतराव कराळे, श्री. आशिष माने, मा. सुहासकुमार बोबडे, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विध्यार्थी – विद्यार्थिनी तसेंच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here