


नागपूर ला शेतकऱ्याची मुलगी सावित्रीबाई फुले नावाच्या होस्टेलमध्ये राहात होती. जागृत होती. संवेदनशील होती. शहाणी होती. नागपूरचे तापमान ४६ डिग्री वाढलले होते. ती मुलगी म्हणाली, अहो फडणवीस साहेब, मुलींच्या होस्टेलमध्ये कुलर लावून द्या.
या फडणवीस नावाच्या माणसाने कुलर तर लावला. पण त्या शेतकरीच्या मुलीला होस्टेलमधून हाकलले. म्हणे तू मला शहाणपण शिकवते.
शेतकऱ्यांनो, असा आहे फडणवीस. द्या मतदान त्यांना. द्या भाजप ला मतदान. आणि पायावर धोंडा पाडून घ्या. उद्या हेच फडणवीस आणि मोदी म्हणतील, ही शेत जमीन सरकार ची आहे. आम्हाला पाहिजे त्याला देऊ. मंदिराला देऊ, अदानीला देऊ. आरएसएस ला देऊ.
शेतकऱ्यांनो, तुम्ही कोणाकडे फिर्याद करणार? कोणत्या कोर्टात जाणार? न्यायाधीश सुर्यकांत कडे? ते तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना न्याय देऊ शकले नाहीत. तुम्ही तर खूप दूर आहात. हेच ते न्यायाधीश, तरूणांना काक्रोच म्हणणारे.
कारण न्यायाधीश सुद्धा भाजप चे सक्रिय सदस्य बनलेले आहेत. निवडणुक आयुक्त भाजपचा आहे. अहो, राष्ट्रपती भाजपचे आहेत. तुमचा वाली कोण? पोलिस? ते शक्यच नाही. लष्कर ? ते शक्यच नाही. मग काय करणार? मठात किंवा मंदिरात, बसून ” मोदी समर्थ, मोदी समर्थ.” असा मंत्र म्हणावा लागेल.
हेच ते मोदी महाशय, काश्मीर जिंकून भारतात विलीन करणार होते. हेच ते मोदी महाशय
पाकिस्तान जिंकून भारतात विलीन करणार होते. अफगाणिस्तान पर्यंत हक्क सांगत होते. येथपर्यंत आमचा भारत होता. तो पुन्हा मिळवणार. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव असा अखंड भारत करणार होते.
वेड्यानो, असे करणे शक्य आहे का? अरे! रशियाला युक्रेन मिळवता आला नाही. चीनला तैवान मिळवता आला नाही.अमेरिकेला इराण हरवता आला नाही. आणि हे फेकूचंद चालले अखंड भारत बनवायला.
आणि तुम्ही अंधभक्त लोकांनी विश्वास ठेवला. बुद्धी न वापरता.
जर फडणवीस आणि मोदी ने तुमची शेत जमीन हिरावून घेतली तर अयोध्येत जा. राम मंदिर मधे भीक मागायला. गाडीबैल, औत, नागर, वखर सोडून कटोरा धरून बसा! टाळ कुटा, म्हणा,
हर हर मोदी, घर घर मोदी!
पुढील पिढ्यांचे भविष्य मी सांगायची गरज आहे का? तितके जरी कळले तरी देव पावला!
✒️शिवराम पाटील(मो:-९२७०९६३१२२)















