


▪️स्थानिक गुन्हे शाखेची कारवाही; मंचेरियाल येथून आरोपीला अटक
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.३०मे):-वेकोलीच्या धोपटाळा टाऊनशिपमधील वसाहतमध्ये आईकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आलेल्या शितल कुंभारे या महिलेचा शुक्रवारी (ता. २९) रात्रीच्या दरम्यान धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेतील आरोपी राजेश व्यंकय्या अटेल्ला याला स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर टीमने तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथून अटक केली आहे.
मृतक शीतलच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार घटनेच्या आदल्या दिवशी मृतक शितल व तीची मुलगी सायंकाळी पाच वाजता फोनवर माझ्यासोबत बोलले. मुलीच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या आईकडे वेकोलीच्या क्वॉर्टर वर राहण्यासाठी आल्या होत्या. मृतकाची आई व भाऊ त्यांच्या घरी असलेल्या पाहुण्यांना कालेश्वर येथे पोहचविण्यासाठी गेल्यामुळे मुलगी आणि मृतक घरीच होते.
मुलीच्या सांगण्यानुसार मुलगी आणि तीची आई एकाच बेडवर रात्री झोपले असता. सकाळी उठल्यानंतर आई दिसत नसल्याने मागच्या खोलीत जाऊन बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पालथी पडलेली दिसली. तेव्हा शेजारी असलेल्या व्यक्तीला घटनेची माहीती दिली. या घटनेची माहीती शेजाऱ्यांनी मृतकाच्या पतीला व राजुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचांनाम्यात घटनास्थळी मृतकाच्या बाजूला रक्ताने हात पुसलेली रुमाल दिसून आली. महिलेल्या गळ्यावर धारदार शस्त्राने वर केल्याचे दिसून आले. त्याठिकाणावरून मृतकाचा मोबाईल आरोपी घेऊन पळून गेल्याचे दिसून आले.
आरोपी घटना घडल्यानंतर राजुरा येथे गेला व तिथून तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे पळून गेला. आरोपीच्या शोधात असलेल्या चंद्रपूर येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेश व्यंकय्या अटेल्ला याला अटक केली आहे. सदरची कारवाही जिल्हा पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमित कचोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद गुरले, सुनिल गौरकार, सर्वेश बेलसरे, पोलीस शिपाई हिरालाल गुप्ता, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, किशोर वाकाटे, संतोष मेलपुलवार, गणेश मोहुर्लेयांनी केली आहे.















