


✒️नाशिक प्रतिनिधी(विजय केदारे)
नासिक(दि.5मे):-येथील गोखले एज्युकेशन सोसायटी, ‘गुरुदक्षणा हॉल’* येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात नासिक जिल्हा कॉलेज टीचर्स मानद चिटणीस श्री.कैलास भाऊ बोरस्ते सर यांना नासिक भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*’नाशिक भूषण’. शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी (NGO),कर्मचारी संघटना, आपत्ती व्यवस्थापन,निवडणूक आयोग प्रशिक्षक प्रवक्ता, तसेच बँकिंग क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल गौरवान्वित करण्यात आले . यावेळी श्री बोरस्ते सर यांनी आपली भावना व्यक्त करताना हा सन्मान माझ्या आजवरच्या सामाजिक आणि प्रशासकीय प्रवासाची पोचपावती असून, भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
हा केवळ सन्मान नाही, तर माझ्या प्रत्येक प्रयत्नाची, संघर्षाची आणि समाजासाठी केलेल्या कार्याची दखल आहे.
तुमच्या आशीर्वादामुळेच हा प्रवास शक्य झाला… पुढेही अशीच साथ राहू द्या ! व आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन चा आभार व्यक्त केले व आपला पुरस्कार आदरणीय प्राचार्य डॉक्टर विलास कुमार देशमुख साहेब शिक्षणाधिकारी (MVP) व आयटीआय प्राचार्य श्री संजय बोरस्ते सर यांच्या चरणी समर्पित केले यांच्या सन्मानाबद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर व प्रदेश संघटक श्री विजय केदारे यांनी शुभेच्छा दिल्या .














