Home महाराष्ट्र भिसी येथे रस्ता रूंदीकरणासाठी झाली तोडफोड पण रस्ता रूंदीकरण कधी?

भिसी येथे रस्ता रूंदीकरणासाठी झाली तोडफोड पण रस्ता रूंदीकरण कधी?

114

✒️भिसी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भिसी(दि.9एप्रिल):-28 फेब्रुवारी 2O25 ला भिसी येथील शंभर पेक्षा जास्त व्यापाऱ्यांची दुकानं रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आली. परंतु आज एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही गावातील मुख्य मार्गाचे रूंदीकरण करण्याचा मुहुर्त निघला नाही, त्यामुळे गावातील पिडीत व्यापारी बांधवांसह सर्वसामान्य जनतेने भिसी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी मॅडम यांना एकच प्रश्न विचारला आहे तो म्हणजे ” CEO मॅडम, आमच्या गावातील मुख्य मार्ग मोकळा श्वास कधी घेणार?

साधारणतः पाच वर्षाआधी भिसी नगर पंचायत ची स्थापना झाली. जवळपास चार वर्ष भिसी नगर पंचायतचा कारभार प्रशासकाच्या भरोश्यावर होता.

अशावेळी येथील संपूर्ण कारभार मुख्याधिकारी यांच्या अधीपत्यात होता. अशातच भिसी नगर पंचायत ला अर्चना वंजारी या तिसऱ्या प्रभारी मुख्याधिकारी मिळाल्या. नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती चिमुर नगर परिषदेसाठी झाली होती. भिसी नगर पंचायत चा प्रभार त्यांना देण्यात आला. अशा परीस्थीतीत भिसी गावचा कारभार चिमुर वरून चालायचा. अशातच भिसी गावाच्या मुख्य मार्गाचा रूंदीकरण करण्याचा विचार नगर पंचायत ने केला व त्यानुसार मुख्य मार्गावरील व अन्य व्यापारी, खाजगी जागा असणारे, व घर मालक सर्वांना त्यांनी मुख्यमार्गावर केलेले अतीक्रमण काढण्याचे नोटीस देण्यात आले. महत्वाचे म्हणजे ज्यांचे दुकान, घर हे मुख्य मार्गापासुन पन्नास ते शंभर फुट दुर अंतरावर होते त्यांना सुध्दा नगर पंचायत प्रशासनाने नोटीस बजावली.

या दरम्यान नगर पंचायत मध्ये मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेत व्यापारी व गावकरी यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मुख्याधीकारी अर्चना वंजारी यांनी आश्वासन दिले होते की अतीक्रमण काढण्याच्या कारवाईनंतर लगेच मुख्य रस्त्याचे सिमांकन करून नाली व रस्त्याचे बांधकम होणार व ज्या व्यापारी बांधवांवर अतीक्रमणची कारवाईत झाली त्यांना पुढील सहा महीण्यात दिवाळीच्या अगोदर दुकानगाळे उपलब्ध करून देणार असे भर सभेत आश्वासन दिले होते. 

           त्यानंतर अखेर 28 फेब्रुवारी 2025 ला नगर पंचायत प्रशासनाने गावातील शंभर पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त केली. यात शेकडो परीवार उध्वस्त झाले. त्यांच्यावर उपासमारी ची वेळ आली. परंतु भवीष्यात सर्व काही बरोबर होईल, गावातील मुख्य मार्गाचे रुंदीकरण होऊन पिडीत व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नवीन दुकानगाळे उपलब्ध होईल ही भाबळी आशा व्यापारी व गावकऱ्यांना होती. परंतु आज जवळपास चौदा महीने होऊनही व्यापाऱ्यांना दुकानगाळे तर उपलब्ध झालेच नाही, मुख्य मार्गाच्या रुंदीकरणाचा मुहुर्त सुद्धा निघाला नाही.

…………………………………………

        मुख्य मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या नावाखाली नगर पंचायत प्रशासनाने गावातिल पन्नास ते साठ वर्षांपासुन अस्तीत्वात असलेली व्यापार पेठ उध्वस्त केली. पूर्वी चिमुर नंतर सर्वात मोठी व्यापार पेठ ही भिसीची होती.भिसी परीसरातील जनता भिसी येथूनच आपला व्यवहार करायचे.परंतु

मागील वर्षभरापूर्वी झालेल्या अतीक्रमण च्या कारवाईमुळे येथील व्यापार पेठ उध्वस्त झाली व भिसी परीसरातील जनतेने सुध्दा भिसीमधून घेवाण देवाण चा व्यवहार पन्नास टक्क्याहुन अधीक प्रमाणात कमी केला. याचे पडसाद भिसी येथील इतर व्यापाऱ्यांना भोगावे लागत आहे.

…………………………………………

       भिसी नगर पंचायत प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अतीक्रमण हटविण्याची कारवाई केली. परंतु नगर पंचायत प्रशासनाकडे रस्ता रूंदीकरण करण्यासाठी कोणतेचं नियोजत नव्हते. नियोजनाच्या अभावामुळे आजपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी व दोन्ही बाजुला नाली बांधकामाचे साधे सिमांकण सुध्दा झाले नाही. याचा अर्थ असा की नगर पंचायत चा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली फक्त भिसी येथील व्यापार पेठ उध्वस्त करने एवढाच उद्येश्य होता की काय ? असा प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here