Home महाराष्ट्र भारतीय संगीत कला पिठाचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

भारतीय संगीत कला पिठाचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

93

▪️आरोही सुगम संगीत म्हणजे महिलांचे हक्काचे मंच – वंदनाताई चटप

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.८एप्रिल)७ एप्रिल रोजी देशपांडे वाडी येथे आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या वतीने जानेवारी सत्रात झालेल्या संगीत परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात वंदनाताई चटप यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपले मत व्यक्त केले. भारतीय संगीत कलापीठ द्वारा मान्यताप्राप्त केंद्र बावन आरोही सुगम संगीत विद्यालय द्वारा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात संगीत शिकणाऱ्या महिलांनी व बाल बालिकांनी गीत गायन, शास्त्रीय तराना, गुरुवंदना आणि रागावर आधारित गीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

याच कार्यक्रमात गोपिका बाई सांगडा पाटील आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी देखील एक समूहगीत सादर करून आपली कला दाखविली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता आरोही सुगम संगीतच्या केंद्रप्रमुख, मार्गदर्शिका व संगीत गुरु अल्का सदावर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या आयोजनाकरिता स्वर प्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी व्यवस्थापन केले. याप्रसंगी मंचावर वंदनाताई चटप, दिलीप सदावर्ते, सुनील रामटेके, अल्का सदावर्ते, छाया मोहितकर, सुषमा शुक्ला उपस्थित होते. वंदनाताई चटक यांनी आरोही सुगम संगीत म्हणजे महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असून उत्तम प्रकारे गीत गायन कला, भाषण संभाषण कला, वक्तृत्व या सर्वांचे उत्तम प्रशिक्षण सदावर्ते दांपत्य अविरतपणे करीत आहेत, सर्व महिला बाल बालिका यांचे अभिनंदन केले.

दिलीप सदावर्ते यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना संगीत कला आणि इतर कला यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू आणि नवकलावंतांना संधी प्राप्त करून देऊ. याप्रसंगी पेटीवादन करणारी वर्ग सहावीची आरुषी डवरे हिचा बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली. उत्तम कार्य करणाऱ्या स्नेहा वाटेकर, सुनिता कुंभारे, संध्या बाळसराफ व आरुषी डवरे यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्का सदावर्ते, अहवाल व मार्गदर्शन दिलीप सदावर्ते, मनोगत पालक प्रतिनिधी विजय भोयर, छाया मोहितकर व सुषमा शुक्ला यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत वंदनाताई चटप यांनी केले तसेच सूत्रसंचालन सुनिता कुंभारे आभार प्रदर्शन स्नेहा वाटेकर यांनी केले या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतंत्र कुमार शुक्ला, पायल ताजने, नयन रामटेके, विना देशकर, ज्योती कोरडे, निर्मला बांगडे, प्रतिभा भावे, आम्रपाली नळे, निर्जला तुमाने, कमल खुजे, कृपाली आत्राम, गीतांजली गेडाम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिकपणे वंदे मातरम या गीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here