


✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.4एप्रिल):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा हा केवळ उत्सव नसून तो सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचा जागर आहे. या पार्श्वभूमीवर जयंती मंडळांना भीम जयंती साजरी करण्यासाठी तसेच पारंपरिक पद्धतीने डॉल्बी (ध्वनीप्रक्षेपक) वाजवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाचे राष्ट्रीय सदस्य डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
डॉ. माकणीकर म्हणाले की,
“भीम जयंती हा बहुजन समाजाच्या भावना, अस्मिता आणि संविधाननिष्ठ विचारांचा उत्सव आहे. या दिवशी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि जनजागृती हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बीला परवानगी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की,
जर पोलिस प्रशासनाने डॉल्बी वाजवण्यास किंवा जयंती साजरी करण्यास मज्जाव केला, तर संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी नकार घ्यावा आणि त्या विरोधात मा. न्यायालयात दाद मागावी. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हा मार्ग योग्य आणि कायदेशीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. माकणीकर हे शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एक उमदे आणि प्रभावी नेतृत्व असून, विद्रोही पत्रकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांनी नेहमीच सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि संविधानिक मूल्यांसाठी ठाम भूमिका घेतली आहे.
शेवटी त्यांनी आवाहन केले की,
“भीम जयंती शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत साजरी करा. पण आपल्या हक्कांवर गदा आली, तर कायदेशीर मार्गाने लढा देण्यास मागे हटू नका.”














