Home महाराष्ट्र गंगाखेड शहरात वीज पुरवठा मुळे नागरिक त्रस्त 

गंगाखेड शहरात वीज पुरवठा मुळे नागरिक त्रस्त 

84

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4एप्रिल):-शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच गंभीर बनली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अ‍ॅड.मिथिलेश केंद्रे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना वीजपुरवठा सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे आहे.जर ही समस्या तात्काळ मार्गी लावली नाही, तर कठोर भूमिका घेण्यात येईल,असा इशाराही अ‍ॅड.केंद्रे यांनी दिला.यावेळी नगरसेवक चंद्रकांत खंदारे, अ‍ॅड.मुंडे,अ‍ॅड.काकाणी,बंटी मेहत्रे आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here