Home चंद्रपूर 80 हजार रुपये द्या आणि महिनाभर खुल्लमखुल्ला रेती मारा-परवानगी देणारा अधिकारी कोण?:...

80 हजार रुपये द्या आणि महिनाभर खुल्लमखुल्ला रेती मारा-परवानगी देणारा अधिकारी कोण?: रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण?

240

✒️रोशन मदनकर(उप संपादक )

ब्रम्हपुरी(दि.31मार्च):- तालुक्यातील वैगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. अर्हेर नवरगाव रणमोचन, खरकाडा, सोंन्द्री, बोढेगाव, बोळधा, हळदा, आवळगाव, कोलारी, बेलगाव या नदीपात्रातून रेतीचा विनापरवाना अवैधरीत्या उपसा मोठ्या जोमाने सुरू आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 80 हजार द्या आणि महिनाभर खुल्लमखुल्ला रेती मारा अशी परवानगी देणारा अधिकारी कोण? असा प्रश्न जनतेमध्ये वादळासारखा पसरत आहे.

रेती तस्करांनी याचा गैरफायदा घेत अवैध उत्खनन वाढवले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवस-रात्र रेती उपसा सुरू असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. भूजल पातळी धोक्यात आली असून, जलस्रोतांवरही परिणाम होत आहे. याचा त्रास नाहक शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळा अशी जनतेची मागणी ब्रम्हपुरी तालुक्यात जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here