Home चंद्रपूर चिमूरच्या नारी शक्तीचा मोठा सन्मान!-हिराई महोत्सवात १ कोटींचा धनादेश प्रदान 

चिमूरच्या नारी शक्तीचा मोठा सन्मान!-हिराई महोत्सवात १ कोटींचा धनादेश प्रदान 

134

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.23मार्च):-येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित ‘जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव – २०२६’ मध्ये चिमूर तालुक्यातील ‘नारीशक्ती महिला प्रभागसंघ, मासळ’ यांना तब्बल १ कोटी (१,००,००,०००) रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला! 

   २० मार्च रोजी झालेल्या या शानदार उद्घाटन सोहळ्यात चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला.

      कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी व पशुसंवर्धन विभाग, जि.प. चंद्रपूर, उमेद अभियान आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथे शेतकरी, महिला बचत गट, उद्योजक आणि पशुपालकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे.

हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी ज्ञान, नवीन तंत्रज्ञान आणि हक्काची बाजारपेठ मिळवून देणारे एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे.

• ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून विकासाला चालना देणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

महिला सक्षमीकरणाचे आणि ग्रामीण विकासाचे हे पाऊल संपूर्ण चिमूर तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे!

सदर धनादेश स्वीकारताना अर्चना बोनसुले तालुका अभियान व्यवस्थापक, श्री. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक व महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here