Home महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष पदा बाबत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

महिला आयोग अध्यक्ष पदा बाबत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

228

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी))मो:-९७६८४२५७५७

सध्याच्या राजकारणात स्पष्ट बोलणारे, ठाम भूमिका घेणारे आणि अन्यायाविरोधात निडरपणे उभे राहणारे नेतृत्व कमी दिसते… पण अशा वातावरणात एक नाव ठळकपणे पुढे येत आहे — सुषमा अंधारे!

डॅशिंग नेतृत्वाची ओळख 

सुषमाताई अंधारे shushma andhare या केवळ राजकारणी नाहीत, तर त्या एक विचार आहेत… पुरोगामी विचारांची, निर्भीड वक्तृत्वाची आणि अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द असलेली व्यक्तीमत्व. अलीकडच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका हेच दाखवून देते. या प्रकरणात त्यांनी आवाज उठवत केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर जबाबदारीची जाणीव करून देत थेट रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली… आणि अखेर ती मागणी जोर धरू लागली!

सत्यासाठी truth आक्रमक लढा!

आज अनेकजण सत्तेच्या भीतीने गप्प बसतात… पण सुषमाताईंनी दाखवून दिलं की, “चूक कोणाचीही असो, आवाज उठवायलाच हवा!”

त्यांच्या या भूमिकेमुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे — कोणीतरी आहे जे आपल्यासाठी लढतंय!

पुरोगामी विचारांची ताकद

सुषमाताई अंधारे या नेहमीच सामाजिक न्याय, स्त्रीसुरक्षा आणि समानतेसाठी उभ्या राहिल्या आहेत. त्यांची भाषा थेट, विचार स्पष्ट आणि भूमिका ठाम — म्हणूनच त्या तरुणाईत विशेष लोकप्रिय होत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बघायला आवडेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here