


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.21मार्च):- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत चिमूर येथील सेंट क्लारेट स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी नेहल महेश साखरकर याने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तळोधी (बाळापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे चिमूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहल हा अनुराधा व महेश साखरकर यांचा सुपुत्र असून लहानपणापासूनच अभ्यासू व जिज्ञासू वृत्तीचा आहे. नियमित अभ्यास, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई अनुराधा साखरकर यांच्या सततच्या प्रेरणेला तसेच मार्गदर्शक शिक्षक अरविंद आत्राम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे. जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. अशा प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवणे हे मोठे यश मानले जाते.
नेहलच्या या यशाबद्दल भरत कुमार, मनोज डोंगरे यांच्यासह शाळेचे प्राचार्य, वर्गशिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.














