Home महाराष्ट्र जागतिक चिमणी दिनानिमित्त 333 परळांचे मोफत वाटप !

जागतिक चिमणी दिनानिमित्त 333 परळांचे मोफत वाटप !

136

▪️वन्यजीव संरक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याचे नागरिकांना आवाहन !

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.21मार्च):- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जागतिक चिमणी दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना मोफत परळ (पाण्याची भांडी) वाटप करण्यात येणार असून, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे.

शहरीकरण आणि तापमानवाढ यामुळे चिमण्या व इतर पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या घराजवळ पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता धरणगाव नगरपालिका येथे आयोजित करण्यात आला मा.नगरध्यक्षा सौ.लिलाताई चौधरी , नगरसेवक निलेश चौधरी, मा.संतोष पवार साहेब( PI) अरविंदभाऊ चौधरी , वनसंरक्षक गणेश धानोरे.उपस्थित होते.

हा उपक्रम वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक पक्षीमित्र कै. रवींद्र सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबविण्यात येत असून, उपलब्धतेनुसार तब्बल 333 परळांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1111 रोपांचे मोफत वाटप करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य सर्पमित्र गणेश गुरव, राधे चौधरी , दिपक महाजन, हर्षल निकम, एजाज खान,विठ्ठू सुतार, रविंद्र वखरे,भरत शिरसाट. तसेच उपक्रम संकल्पना अजीम काझी व बाळासाहेब देवरे व मार्गदर्शन अध्यक्ष रवींद्र फालक ,सचिव योगेश गालफाडे, उपाध्यक्ष मुकेश सोनार, प्रदिप शेळके,सतीश कांबळे, धरणगाव येथे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

हा उपक्रम संस्थेचे सदस्य स्वखर्चाने राबवत असून, अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्य केल्यास हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविता येतील, असे मत संस्थापक बाळकृष्ण देवरे (वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव) यांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण आणि पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्या सोबतच त्यांच्या हातून मुबलक ठिकाणी पक्षांच्या पाणपोई उभ्या राहणार असल्याने पक्ष्यांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here