


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
सिंदेवाही(दि.21मार्च):-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपुरचे संयुक्त विद्यमाने नांदगाव येथे विकास मच्छीपालन सहकारी संस्थेचे सभागृहात संस्थेचे सभासद प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
महर्षी वाल्मीक ऋषी यांचे प्रतीमेला अभिवादन करून सुरवात झालेल्या प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन सहकार प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य भारत फलके होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन विकास ग्रामिण मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अरूण सहारे उपस्थित होते.
सहकारी संस्थेचे उद्देश, कार्य व जबाबदारी समजुन घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. संस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन, नियमित सभा, सभासदांचा सक्रीय सहभाग, असल्याशिवाय संस्थेचा पर्यायाने समाजाचा विकास शक्य नाही, त्यासाठी सहकारी कायदा, नियम उपविधीतील तरतुदी याबाबत शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. सहकारी कायद्याचे कलम 25 (अ) नुसार प्रत्येक सभासदाला प्रशिक्षण घेणे बंधनकारक असल्याचे उपप्राचार्य भारत फलके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले. संस्थेचे सचिव प्रकाश मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.














