


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.18मार्च):-करीअर कट्टा उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले.
सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांना करीअर कट्टा च्या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. “विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अमित भोळे (संचालक, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार) व मा. डॉ. विपिन इटनकर (आयुक्त, नागपूर महानगरपालिका) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी मा. ॲड. अभिजित वंजारी (आमदार, महारष्ट्र विधान परिषद) होते. मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) व मा. डॉ. स्मिता वंजारी (सिनेट सदस्या, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ) उपस्थित होते.
दरम्यान डॉ. सुनंदा आस्वले यांनी हे पुरस्कार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आणि करीअर संसद चे पदाधिकारी व सदस्य यांच्या समर्पित कार्यामुळे हे यश संपादित झाले आहे आणि या पुरस्कारामुळे अधिक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवण्यास प्रेरणा मिळाली आहे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, करीअर संसद चे पदाधिकारी व विद्यार्थांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले व करीअर कट्टा चे समन्वयक डॉ. मृणाल वऱ्हाडे यांचे अभिनंदन केल.














