Home चंद्रपूर पहेला येथे कडधान्य विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न 

पहेला येथे कडधान्य विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न 

69

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.12मार्च):-तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी पहेला येथे कडधान्य विकास योजनेअंतर्गत धान्य पिक पड क्षेत्रात हरभरा लागवड प्रकल्पावर आधारित हरभरा पिक प्रात्यक्षिक घेणाऱ्या शेतकऱ्या ंकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा लागवड तंत्रज्ञान, पीक काढणी पश्चात प्रक्रिया व विपणन बाबत मार्गदर्शन करण्यात आले .सदर प्रशिक्षण सौ यामिनी सुरेश बांडेबुचे माजी जि प सदस्या यांचे अध्यक्षतेखाली ,ए .पी. जिभकाटे मंडळ कृषी अधिकारी पहेला यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.

हरभरा प्रकल्पात समाविष्ट नुकत्याच विदेश दौरा करून भारतात सौ. यामिनी सुरेश बांडेबुचे परत आल्या. यानिमित्त औचित साधून सत्कार त्यांच्या सत्कार करण्यात आला .व विदेश दौऱ्या दरम्यान त्यांनी आपले आलेले अनुभव कथन केले .सदर कार्यक्रमाचे संचालन कु. मीनाक्षी लांडगे सहाय्यक कृषी अधिकारी निमगाव यांनी केले. तर आभार कु. श्वेता ओरके सहाय्यक कृषी अधिकारी दवडीपार बाजार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रोशन नाकाडे सहाय्यक कृषी अधिकारी मानेगाव तसेच पहेला येतील कृषीताई श्रीमती उमावती कावळे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here