


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
परभणी आज बुधवार दिनांक 11 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या सुमनबाई उगले यांची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असून
कौशल्याबाई शिंदे यांची उपनेतापदी निवड करण्यात आली आहे. आज बुधवार दिनांक 11 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.तर परभणी जिल्हा परिषच्या अध्यक्षपदा करीता दिनांक 18 मार्च रोजी विशेष सभाचे अयोजन करण्यात आली आहे.
या पाश्वभुमिवर आज गटनेतेची निवड केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुजा सावंत,सावित्राबाई फड,शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे,महिला जिल्हाप्रमुख गिताताई सुर्यवंशी,ग्रामिण जिल्हाप्रमुख विशाल कदम,माणिक पोंढे,अशोक गव्हाणे आदी सह शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














