Home चंद्रपूर राज्‍यामध्‍ये नविन ऑटोरिक्षा चालकांसाठी परवाने बंद केल्‍याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन

राज्‍यामध्‍ये नविन ऑटोरिक्षा चालकांसाठी परवाने बंद केल्‍याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन

139

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.11मार्च):- राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांनी मागणी होती की, राज्‍यात ऑटोरिक्षा चालकांची संख्‍या जास्‍त असल्‍यामुळे राज्‍यात ऑटोरिक्षा परवाने बंद करण्‍यात यावे. या मागणीला घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सोबत ऑटो संघटनेचे पदाधिकारी वारंवार बैठका घेऊन चर्चा करण्‍यात आली होती. राज्‍याचे विधानसभा अधिवेशन चालु असल्‍यामुळे आ. मुनगंटीवार विधानसभेत तारांकित प्रश्‍न विचारला असता राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांची संख्‍या मोठया प्रमाणात असल्‍यामुळे राज्‍यातील ऑटोरिक्षा नविन देणे बंद करण्‍यात यावे. हा विषय विधानसभेमध्‍ये मांडल्‍यामुळे राज्‍याचे परिवहन मंत्री यांनी प्रताप सरनाईक विधानसभेमध्‍ये प्रश्‍नाला उत्‍तर देताना राज्‍यातील नविन ऑटोरिक्षा परवाने देण्‍यात नसल्‍याचे विधान परिषदेत सांगीतले.

वरिल ऑटोरिक्षा चालकांची मागणी विधानसभेत महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मंत्री तथा आमदार मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करुन केली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मागणीला यश मिळाले असून राज्‍यातील आणि चंद्रपूर जिल्‍हयातील तमाम ऑटोरिक्षा चालकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, उपाध्‍यक्ष विनोद चन्‍ने, कुंदन रायपुरे, रवी आंबटकर, राजु मोहुर्ले, बंडू भगत, मंगेश चवरे, खुशाल साखरकर, रमेश वझे, विलास बावणे व इतर ऑटोरिक्षा चालकांनी राज्‍याचे परिवहन मंत्री ना. सरनाईक व आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here