Home चंद्रपूर आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न

253

▪️शेणाच्या चकल्या आणि समाजातील दुर्गुण यांचे केले अग्नीदहन

▪️पर्यावरण जनजागृती नृत्य व नाटिकेनी वेधले लक्ष

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२मार्च):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काउट्स गाईड्स कब बुलबुल युनिट आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे पर्यावरणपूरक होलिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहरराव साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकर जानवे, अविनाश निवलकर, अल्का सदावर्ते, नेफडो च्या नागपूर विभाग महिला अध्यक्षा सुनैना तांबेकर, महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष रवी बुटले, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे,मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, पालक प्रतिनिधी विजय तलांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवले. कागदी व प्लास्टिक कचरा संकलन करून प्लास्टिक कचरा नगर परिषद राजुरा यांना दिला. पर्यावरणपूरक रंग तयार केले. विशेष म्हणजे शेणाच्या तीन हजार आठशे चकल्या यांचा वापर होळीकरीता करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी मानसी आस्वले व आयुशा आगलावे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री धोटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीवर आधारित नृत्य व नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर पेंटिंग करून विविध संदेश दिले. गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक होलिकोत्सव आदर्श शाळेत साजरा करण्यात येतो. लोप पावत चाललेल्या शेणाच्या चकल्या या लक्षवेधी ठरल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here