Home चंद्रपूर जि.प. उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा महाकुंभ

जि.प. उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा महाकुंभ

156

▪️जुन्या आठवणींना उजाळा देत विकासाचा संकल्प.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२मार्च):-“ऋणानुबंधाच्या जीवापावेतो गाठी , पुन्हा एकदा भेटूया शाळेच्या काठी” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत जि.प.उच्च प्राथमिक शाळा दहेगावच्या प्रांगणात १ मार्च २०२६ रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. ग्रामपंचायत दहेगाव च्या वतीने आयोजित या सोहळ्यात अनेक दशकानंतर एकत्र आलेल्या माझे विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला सातपुते होत्या तर उद्घाटक म्हणून सरपंच विशाल नानाजी पारखी यांची उपस्थिती होती.

प्रमुख उपस्थिती जंगलुजी साळवे ,माजी विद्यार्थी तथा माजी सरपंच दहेगाव डॉ. सुरेश महाकुलकर ,माजी नगराध्यक्ष महानगरपालिका चंद्रपूर, देवराव काळे, वासुदेव खापणे, महेश सोनटक्के, गजानन चिडे, शारदा ढवळे, विठ्ठल बोधाने, विलास ढगे यांची उपस्थिती होती. माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

आठवणींचा प्रवास या सत्रात माजी शिक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका व विविध कला कौशल्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. भविष्यातील उपक्रमांसाठी माजी विद्यार्थी समिती स्थापन करण्यात आली. पसायदान आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल कोटावर, किशोर साळवे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन कडूकर , सागर चिंचोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी माजी विद्यार्थी शेषराव ढगे, गणपत चिंचोलकर , पार्वताबाई डाहुले , सुखदेव मेश्राम, दादाजी मेश्राम , आशिष येटे , दीपक सोनटक्के , बाळकृष्ण सोनटक्के , अविनाश जुमडे , अतुल वडसकर , राजू सोनटक्के , अमोल जुमडे , प्रकाश भुसारे , ज्ञानेश्वर महाकुलकर, अशोक सोनटक्के , विठ्ठल बोढे, ब्रम्हदेव टाले, अरुण कवडापुरे, दशरथ झाडे, रमेश मेश्राम, संजय तामगाडगे, भाऊराव काळे, स्वागता सरपाते आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here