Home चंद्रपूर प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा उत्साहात समारोप 

प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा उत्साहात समारोप 

82

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28फेब्रुवारी):-प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपनाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप हेटी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुखदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून हेटी चे सरपंच एड. अरविंद तिरणकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , जि. प. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मस्के , सामाजिक कार्यकर्ते कवडू पाटील बोरडे, नानाजी साखरकर, सौ. संगीता ढवस आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी प्रा. राजू मेश्राम यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र देवाळकर यांनी सात दिवसीय निवासी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला.

प्रमुख मार्गदर्शक हेटी गावचे सरपंच अरविंद तिरणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रासेयो शिबिरामुळे स्वयंसेवकात सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण व सेवाभाव विकसित होते असे प्रतिपादन केले. तर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विविध दाखले देत विद्यार्थ्यांनी आवर्जून ग्रामगीता वाचावी आणि त्यातील कार्यप्रेरणा घेऊन जीवनाला नवी दिशा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्ती निर्माण होते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री. मस्के यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य सुखदेवे यांनी स्वयंसेवकांनी शिबिरात केलेल्या विविध कामाचे कौतुक केले.

शिबिर स्वयंसेवकांनीही यावेळी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु. तनवी डाखरे यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. देवाळकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.याप्रसंगी हेटी मधील गावकरी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here