


✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रह्मपुरी(दि.30जानेवारी):- ब्रह्मपुरी वडसा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व अपुरा असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनातील वर्दळ करताना कमालीचा त्रास होत आहे. हा कमालीचा त्रास बघता रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत डांगे यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्राह्मपुरी येथे 26 जानेवारी सोमवारला बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणचा पाचवा दिवस असताना प्रशासनाला अजून जाग आली नसल्याने ब्रम्हपुरीवासियांनो प्रशांत डांगे तुफानाला आता साथ द्या.
प्रशांत डांगे यांचे उपोषणाचा लढा रस्त्यासाठी नाही, तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी आहे. महामार्गावरील दुरावस्था, अवैध रेतीतस्करी आणि अपघात याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन, नगरपरिषद आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये द्वेष निर्माण होत आहे. ब्राह्मपुरी आरमोरी मार्गावरील रेल्वे उड्डाण पूल आणि भुती नाला पुलाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण आहे. फोडलेले रस्ते अर्धवट असल्याने पावसाळा आणि उन्हाळ्यात नागरिकांसाठी हे रस्ते जीवघेणे ठरत आहे.
त्यामुळे ब्रम्हपुरी वासियांनो तुमची खरी लोकशाही जागी करून उपोषणकर्ते प्रशांत डांगे यांना साथ द्या. उपोषण कर्तेचे प्रमुख मागणी वडसा महामार्गाचे काम ठराविक वेळेस पूर्ण करा, आरमोरी रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करावे, भुती नाला व उड्डाण पुलाच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नगर परिषदेमार्फत फोडलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावे आणि शहरातील अवैध रेती तस्करी तात्काळ थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी.














