


▪️विजयी स्पर्धकांना मोमेंटो, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार !…..
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.30जानेवारी):- शतकोत्तरी ज्ञानगंगा पी आर हायस्कूल चे दिवंगत उपमुख्याध्यापक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध स्पर्धा घेतल्या गेली. इंग्रजी भाषेचे दृढीकरण व्हावे या हेतूने लेखन समृध्द व्हावे म्हणून दोन स्पर्धा घेतल्या गेली त्यात इंग्लिश स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आणि इंग्लिश निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात सुमारे 60 70 विद्यार्थ्याने सहभाग नोंदवला.
इंग्लिश निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक *हर्षाली गणेश मराठे*
द्वितीय क्रमांक *हेमांगी ज्ञानेश्वर ठाकूर*
तृतीय क्रमांक *नम्रता प्रवीण ओस्तवाल*
तर स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन मध्ये प्रथम *मोहित कमोदे* द्वितीय क्रमांक *काजल शाम कोळी* तृतीय क्रमांक *मृणाल पाटील* या विजयी स्पर्धकांना मोमेंटो प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली या स्पर्धेचे परीक्षांना श्री आर जे धनगर सर, पी व्ही असोदेकर सर . एन सी पाटील, एस पी सोनार सर परीक्षण केले.
त्यांना देखील मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब अरुण कुलकर्णी होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की ह्या स्पर्धा भाषा समृद्धीचे प्रतीक आहे. प्रमुख अतिथी संस्थेचे मानद सचिव डॉ मिलिंदजी डहाळे, संचालक अजय जी पगारिया, बी एस एन एल चे सेवानिवृत्त अधिकारी एम एम परदेशी साहेब व हॉटेल गुरुकृपा चे मालक देवालालजी बयस होते. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक मेजर डी एस पाटील सर होते डॉ मिलिंद जी डहाळे यांनी कै आप्पासाहेब आर बी सूर्यवंशी सर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन जी आर सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जी पी चौधरी सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पी जी पाटील, एस बी घुगे, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर यांनी परिश्रम घेतले.














