Home महाराष्ट्र लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजपाला मत देऊ नका-ॲड. बाळासाहेब आंबेडकर

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजपाला मत देऊ नका-ॲड. बाळासाहेब आंबेडकर

123

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26जानेवारी):-भारत देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली असून ती जिवंत ठेवायची असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान न करता पर्यायी राजकीय शक्तींना बळ देणे गरजेचे आहे,असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश(बाळासाहेब)आंबेडकर यांनी केले.महातपुरी येथे रुक्सनाबी अफजल शेख या पंचायत समिती गण मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ (दिनाक २५ जानेवारी रविवार) रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधारी सरकारवर तीव्र टीका करताना सांगितले की,आजच्या लोकशाही प्रक्रियेत बिनविरोध निवडणुका या दहशतीच्या वातावरणात होत आहेत. २०१४ पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारकडून ईडीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांना धमकावले जात असून,जेलमध्ये टाकू अशा भाषेने भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.ॲड.आंबेडकर पुढे म्हणाले की, राजकीय लोकशाहीत वाढत चाललेला हा दहशतवाद अत्यंत घातक असून याविरोधात नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे.संविधान,लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल,तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे.वंचित बहुजन आघाडीला मिळणारे प्रत्येक मत हे लोकशाहीच्या संरक्षणासाठी टाकलेले मत ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या सभेला व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे,महासचिव शुद्धोधन सावंत,भारतीय बौद्ध महासभेचे पंडित पारवे,बौद्धाचार्य रमेश जोंधळे,लहुराज केदारे,तालुकाध्यक्ष गजानन पारवे, गोरखनाथ कांबळे,उमेदवार रुक्सनाबी अफजल शेख,अमजद शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सभेला महातपुरी पंचायत समिती गणातील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here