Home महाराष्ट्र उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शिवराज शिंदे...

उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शिवराज शिंदे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक

74

▪️तहसीलदार सुरडकर यांच्या विनंतीवरून आमरण उपोषण मागे

✒️कुणाल श्रवले(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि.26जानेवारी):- तालुक्यातील चुरमुरा येथे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन शिवराज बाळासाहेब शिंदे (शिंदे कंट्रक्शन) हे करीत असल्याने उमरखेड प्रेस क्लबने तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार ची दखल तहसीलदार सुरडकर यांनी घेतली असून १) नायब तहसीलदार, (महसूल) उमरखेड २) मंडळ अधिकारी, विडूळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. पुढील कारवाई काही दिवसात करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार वि. राणे यांनी दिली आहे.

संदर्भ :- श्री. शामभाऊ धुळे अध्यक्ष उमरखेड प्रेस क्लब व ईतर ०४ यांची तक्रार. उपरोक्त विषयान्वये संदर्भीय तक्रार प्राप्त झाली असून, तक्रारीची प्रत यासोबत आपनाकडे पाठविण्यात येत आहे. तक्रारीत नमूद मुद्यावर सखोल चौकशी करुन आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या बयानासह वस्तुस्थितीदर्शक व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सविस्तर अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावा. प्रतिलीपी :-

श्री. शामभाऊ धुळे अध्यक्ष उमरखेड प्रेस क्लब व ईतर ०४ यांना माहिती करीता आपली संदर्भीय तक्रार वरीलप्रमाणे चौकशीकरीता रवाना करण्यात आलेली आहे. सबब आपन आपले नियोजीत उपोषन मागे घेवून प्रशासनास सहकार्य करावे. असे लेखी पत्र देऊन उपोषणकर्त्यास तहसीलदार यांच्याकडून विनंती करण्यात आली आहे. सदर विनंतीचा मान ठेवून आयोजित केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. 

यावेळी उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, कोषाध्यक्ष अशोक धुळे, प्रसिद्धीप्रमुख बबलू भालेराव, कुणाल श्रवले,सल्लागार प्रसेनजीत दिवेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here