


✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.23जानेवारी):-तालुक्यातील दवडीपार बाजर येथील आदर्श विद्यालय मध्ये सनराईज कंप्युटर च्या सहकार्याने इय्यता १० वी चे मार्च २०२६ मध्ये बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित कडून तयार केलेला परीक्षेची तयारी आणि मार्कांची भरारी हा विशेष उपक्रम १९ जानेवारी २०२६ ला घेण्यात आला.इयत्ता १० वी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्यामुळे, SSC परीक्षेची तयारी अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने MKCL कडून दोन महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ते म्हणजे SSC Smart Tips Course (परीक्षेची तयारी मार्कांची भरारी) आणि नमूना प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना उत्तम मार्क मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स, उत्तरपत्रिका सोडवण्याचे स्मार्ट तंत्र, दहावींच्या सर्व विषयांसाठी स्मार्ट टिप्स, परीक्षेचे वेळ व्यवस्थापन, इयत्ता १० वी नंतरच्या करिअर मार्गदर्शनाचा समावेश प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यालयाचे प्राचार्य मारोती लांजेवार सर यांनी विद्यार्थ्यांना याचे महत्व काय असते हे पटवून देऊन एम. के. सी. एल. भंडारा वरून आलेल्या कु. निकिता तोरंवार यांनी प्रेझेंटेशन च्या द्वारे संम्पूर्ण माहिती दाखविली. महत्वाचे विडिओ आणि Ai चे टूल्स समजावून सांगण्यात आले. त्यावेळेस शाळेचे शिक्षक श्याम गावळ, टेम्भूर्णे मॅडम, हजारे मॅडम , सनराईज कंप्युटर चे संचालक विलास बांडेबुचे तसेच कु. आचल आजबले, तृप्ती तिजारे, किरण सार्वे या ठिकाणी उपस्थित होते.














