


✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.25नोव्हेंबर):-साकोली येथील-पंचशीलवार्डात व शिवाजी वार्ड अनेकांचे पडक्या अवस्थेत घर आहेत. त्यांच्या झोपड्या आहेत . कित्येकांच्या घरात पाणी जाते. मोठा त्रास सहन करावा लागतो . अनेक नागरिकांनी घरकुल चे फॉर्म भरलेले आहेत. परंतु अजून घरकुल त्यांना मिळालेले नाही.त्यामध्ये अरुण बडोले ,ममता वाहने व इतरही बहुतांशी लोक त्या वार्डामध्ये राहतात. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते .परंतु अनेकांचे घरकुल मंजूर करत असताना या गरीब लोकांच्या घरकुलांकडे मात्र कानाडोळा करण्यात आलेला आहे .ते पैसे खर्च करीत नसल्यामुळे व त्यांना माहिती नसल्यामुळे व कोणी मार्गदर्शन करत नसल्यामुळे त्यांचे घरकुलचे काम थंड अवस्थेत रखडलेले आहेत.
त्यामुळे त्यांना घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे जे सदन आहे त्यांना घरकुल मिळालेला आहे. परंतु गरीब आहेत त्यांना घरकुल मिळालेले नाही असं त्यांच्या आरोप आहे .म्हणून या परिसरात पुन्हा सर्वे करून त्यांना घरकुल कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, प्रतिनिधींनी ,लोकप्रतिनिधींनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे अशी मागणी माजी महिला जिल्हा संघटक विद्या रंगारी यांनी केली आहे.














