


✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.20नोव्हेंबर):-येथील समस्त सुवर्णकार समाज – सराफ असोसिएशन धरणगाव तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत निवेदन देऊन न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपल्या लगतच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे त्या चिमुरडीची हत्या करण्यात आली आहे. सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी तसेच समाजमन ढवळून काढणारी अतिशय निंदनीय घटना आहे. या प्रकरणातून समाजात दिवसेंदिवस वाढणारी विकृत मानसिकताही समोर आली आहे. या प्रकारातील अत्याचारग्रस्त व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून देणे समाज म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टात होऊन आरोपीस कठोरात कठोर शासन करून देहदंडाची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करत आहोत.
सदर घटनेचे निवेदन धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षकसुनिल पवार तसेच तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार संदीप मोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव शहरातील श्री सुवर्णकार सर्व शासकीय सोनार समाजाचे ईश्वरशेठ सोनार, दत्तात्रयशेठ सोनार, दिपकशेठ सोनार तसेच सोनार समाज बांधव यांसह शहरातील विविध क्षेत्रातील राजेंद्र धनगर, लक्ष्मणराव पाटील, नंदू धनगर, खलील (बंटी) खान, राजिद कुरेशी, प्रफुल पवार, अमोल सोनार, चेतन शिंपी, सागर महाले, शोएब खाटीक, शाहरुख शेख इतर असंख्य सर्व समाज बांधव ऊपस्थित होते.














