Home महाराष्ट्र औंध गटात हाय होल्टेज वातावरण,कुणाला मिळणार संधी

औंध गटात हाय होल्टेज वातावरण,कुणाला मिळणार संधी

310

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.2ऑक्टोबर):*सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला असून पंचायत समिती औंध आणि सिद्धेवर कुरोली गण सर्व साधारण असल्यामुळे राजकीय समीकरणे गतिमान झाली आहेत..

औंध गट हा कायमस्वरूपी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेला असला तरी आता मात्र औंध गटातील राजकारणाची समीकरणे बदलण्याची चित्रे दिसू लागली आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात लोकांन मध्ये होत असताना दिसत आहे.

ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू मा. अंकुश गोरे यांनी औंध गटातील गावा गावातील कार्यकर्ते यांची मोठी फळी तयार केली आहे.यामुळे अंकुश गोरे यांच्या माध्यमातून औंध गट आता राष्ट्रवादीला सोपा जाईल असे आता तरी म्हणता येणार नाही.

अंकुश गोरे यांच्या माध्यमातून औंध गणा मधून सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे औंध गणात आपल्या पत्रकारिता करत असताना ठेवलेला दांडगा संपर्क औंध गावचे युवा तरुण ओंकार इंगळे राजकारणात गेले अनेक वर्षे पाय रोवून तळा गळा पर्यंत माणसांची नाळ जोडलेले नेतृत्व औंध गावचे माजी उपसरपंच संतोष भोसले त्रिमली गावाचे युवा उधोजक दादासाहेब इंगळे यांनी आपल्या उधोगाच्या मार्फत लोकांशी संपर्क ठेवून आपली ओळख निर्माण केली आहे.

जायगाव गावामधील रिटायर्ड शिक्षक श्री गोरख देशमुख सर यांनी सुद्धा आपल्या मन मिळावू स्वभावाने लोकांशी मोटा संपर्क जोडला आहे.औंध गटातील सर्वच लोकांशी त्यांचे आपुलकीचे नाते आहे मग आता यामध्ये कुणाच्या नावावर शिक्का मोर्तफ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र वरील नावांची चर्चा औंध गणात जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here