Home महाराष्ट्र शिखर शिंगणापूर येथील मागासवर्गीय कुटूंबाची अतिक्रमणे कायम करण्याचा ग्रामपंचायतचा ठराव

शिखर शिंगणापूर येथील मागासवर्गीय कुटूंबाची अतिक्रमणे कायम करण्याचा ग्रामपंचायतचा ठराव

532

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️मागासवर्गीय कुटूंबावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास उपोषण करणार : शशिकांत भोसले मा. सरपंच

म्हसवड(सातारा)(दि.2नोव्हेंबर):-शिखर शिंगणापूर ता. माण, जि. सातारा येथील उच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात ग्रामसभा दिनांक २९/१०/२०२५ रोजी पार पडली त्या सभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी श्री. रामचंद्र गौंड यांनी कोल्हापूर येथील मुंबई सर्किट ब्रांच येथील उच्च न्यायालयात अपील २५ पिआयएल-१२८-२०१६-सार्वजनिक हितसंबंध खटल्याचे वाचन केले. 

या उच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल शिखर शिंगणापूर चे सर्व रहिवाशी नाराज असून एका याचिकाकर्त्याने प्रतिवादी जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार माण, ग्रामपंचायत शिंगणापूर यांचे नावे खटला टाकून तो एकतर्फे निकाल झालेला आहे. सदरचा खटला एकतर्फी निकाल झालेने गावावर शोककळा पसरली आहे. आम्हा गावाच्या मते सर्व मागासवर्गीय बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर इतर ह्या समाजाची घरे आहे त्याच जागेवर आहेत, यांची रहिवाशी वास्तव्य असणारी घरे ही पूर्ण ४२०,४२३ मध्येच अनेक वर्षापासून आहेत माझ्या मते काही जणांना इंदिरा आवास घरकुल बांधून दिलेले आहेत. ही शासनाने बांधून दिलेली सर्व घरकुले योजनेतील घरकुल ही ग्रामपंचायत यांनी स्वतः बांधून दिलेले आहेत.

गट क्रमांक ४२० मध्ये बौद्ध, मातंग, चांभार इत्यादी व गट क्रमांक ४२३ मध्ये ढोर समाज व मातंग समाज, बौद्ध समाज, रामोशी समाज चांभार समाज व इतर हे सर्व मागासवर्गीय पहिल्यापासून वास्तव्यास आहेत, गेली १९७० ला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बांधून दिलेली घरे त्याच जागेवर आहेत, त्यावेळी पासून आज पर्यंत कोणता गट कुठे आहे हे आजपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते. सर्व गाव गोडी-गुलाबीने नांदत होता, एका याचिकाकर्त्यामुळे आज गावावर शोककळा पसरली आहे, ही सर्व मागासवर्गीयांची घरे महादेव मंदिरापासून १.५ ते २ किलोमीटर अंतरावर आहेत, मेन रोड पासून १५० मिटर अंतर सोडून मागे आहेत, या घरांची रस्त्याला कोणतीही अडचन निर्माण होत नाही. कोणत्याही मागासवर्गीयांची गावाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही, त्या मुळे त्यासमाजात आज पर्यत शासनाच्या सुखसोयी-विज, आरोग्य, पाणी, रस्ते, शाळा अंगणवाडी, समाजमंदिरे, सभा मंडप, शौचालय, स्मशानभुमी इत्यादी सुखसोविधा पुरविल्या आहेत, त्यामुळे आज संपूर्ण गाव मागासवर्गीयांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

त्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक प्र.आ.यो.-२०१७/प्र.क्र. ३४८/योजना-१० दि.१६ फेब्रुवारी २०१८ चे शासन निर्णय – सर्वांसाठी घरे -२०२२ या धोरणानुसार शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमण नियमानुकुल होणे बाबत असा निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे, त्यानुसार ही सर्व घरे आहेत त्याच जागेवर नियमानुकूल व्हावीत असा एकमताने ग्रामसभा ठराव करून आम्ही पुर्ण गाव त्यांचा सोबत आहे असे मत लोकनेते मा. सरपंच, चेअरमन शिंगणापूर मोही बि. शेती पतसंस्था श्री. राजाराम महादेव बोराटे यांनी व्यक्त केले.

आमचा समाज गावोगावी गावकुसा बाहेर असतो हे वास्तव आहे, त्याप्रमाणे शिखर शिंगणापूर मध्ये सुद्धा आमचा मागासवर्गीय समाज गावकुसाबाहेरच आहे गावापासून १ किलोमीटर अंतरावर आहे. त्याच प्रमाणे गावामध्ये प्रवेश करताना प्रथम दर्शनी आमचा समाज आहे, गावातील लोक आमच्या समाजापर्यंत घरे बांधत आली आहेत, मागासवर्गीय समाज आहे त्याच ठिकाणी आहे, आणि आज मागासवर्गीय समाज प्रथम दिसत आहे, त्या समाजामध्ये शासनाच्या तरतुदीनुसार घरकुला मुळे चांगली घरी दिसत आहेत गावामध्ये प्रवेश करताना समाज एक नंबरला येत आहे त्या समाजाचे महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्या वस्तीला नाव आहे, गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मुख्य चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव आहे हे सवर्ण व मनोवादी लोकांना गेली कित्येक वर्षे ते नाव व ती घरे त्यांच्या मनाला रुचत आहेत, त्यांच्या मनामध्ये या समाजाबद्दल गृणा निर्माण होत आहे व आकस निर्माण होतो.

त्यासाठी गावातिलच अशिक्षिताच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला पैशाची रसद पुरवून गेल्या २०१६ पासून या मागासवर्गीयांच्या विरोधात उतरवून त्याप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे आदेश मिळवला. गावातील काही लोकांना आनंद झाला, काहीनी ग्रामसभेची नारजी वृत्तपत्रावर घेतली, असे काही लोक या समाजासाठी घातक आहेत, भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली तरी मागासवर्गीयाला स्वातंत्र्य मिळाले नाही याची मनाला खंत वाटत आहे. जर काय आमची मागासवर्गीय कुटूंबाची घरे राजकीय हव्यासापोटी काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि आमच्यावर अन्याय होत असेल तर सर्व मागासवर्गीय समाज उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असे मा. सरपंच श्री. शशिकांत पांडुरंग भोसले यांचे विचार व्यक्त केले आहेत.

यावेळी बोलताना लोकनेते श्री. राजाराम बोराटे, शिंगणापूर सरपंच सौ. वर्षा दणाने, उपसरपंच डॉ. अतुल बंदुके, सदस्य शंकर तांबवे, सदस्य श्री. शितल बडवे, सदस्या सौ. कावेरी खंदारे, सदस्य श्री. शशिकांत भोसले व मान्यवर उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here