


अमरावती ( प्रतिनिधी ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे विचार मानवतावादी होते. प्रखर राष्ट्रभक्ती, स्वावलंबन व सत्य, अहिंसाचे ते पूजक होते. त्यांच्या या विचारांची आज गरज आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई यांनी व्यक्त केले.
ते विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय संस्था येरला जि.अमरावती द्वारा संचालित जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोर्शी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीरकुमार सवाई, प्रमुख अतिथी शैलेश ठाकरे होते. अध्यक्ष,प्रमुख अतिथी व सर्व शिक्षक – शिक्षिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी कु.ज्योती पद्मने ( बुंदेले ), कु. व्ही.ई. कानबाले, कु. एस. वाय. अजमिरे, ए. एम. गावंडे, कु.एस.जी. गाडगे, कु.एस.एस. इंगळे, कु. टी. ए. श्रीराव, कु. एस. एस. नाखलेश्री, बी. एन. भारती, प्रा. कु.यु.बी. ढोकणे, प्रा. डी. बी.जावळे,प्रा.आ.जी.कोटांगळे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर भाषणं दिली. कार्यक्रमाचे संचालन कु. व्ही. ई. कानबाले तर आभार श्री भारती सर यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी डी.ए.तंतरपाळे, एम. एन. गोमकाळे, एन.जी.चौधरी उपस्थित होते.













