Home चंद्रपूर ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद समोर पुरोगामी शिक्षक संघटनेचा आंदोलन

६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद समोर पुरोगामी शिक्षक संघटनेचा आंदोलन

393

 

चंद्रपूर- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त् प्राथमिक शिक्षकांचे महत्वाच्या समस्या प्रलंबित असून संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देण्यात आली मात्र बाबुगिरीच्या अडेलतटटू धोरणामुळे व प्रशासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे ब-याच समस्या प्रलंबित आहेत. सेवानिवृत्त् शिक्षकांचे गटविमा रक्क्म अप्राप्त् आहेत. बदली पोर्टलने बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त् करण्यात आलेले नाही, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात असलेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेशन योजना लागूसंबंधी मंजुरी आदेश निर्गमीत केलेले नाही. नक्षलग्रस्त् आदिवासी क्षेत्रात कार्य केलेल्या प्राथमिक शिक्षकांना अनुज्ञेय असलेल्या प्रोत्साहन भत्याातची व थकबाकीच्या दुस-या टप्याची रक्क्म जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे थांबलेले आहेत, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या अन्यायकारक निर्णयामुळे वेतनत्रुटी अहवाल २०२४ च्या अनुषंगाने पंचायत समितीस्तरावर सुचना केलेले नाही त्यामुळे अन्यायकारक पदवीधर शिक्षक सुधारीत वेतनापासून वंचित आहेत, उच्च् श्रेणी मुख्याध्यापक,
केद्रप्रमुख व विस्तार अधिकारी ची अनेक पदे रिक्त् आहेत, प्राथमिक शिक्षकांकडे उच्च् श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांचा प्रभार आहे परिणामी शैक्षणिक कार्य व पर्यवेक्षीय कार्य प्रभावीत होत आहेत, उपक्रमांचा भडीमार होत असल्याने शिक्षक बेजार झालेले आहेत, वरिष्ठश्रेणीचे प्रस्ताव मंजुर न झाल्याने शिक्षकांना एस १० प्रमाणे कमी वेतन घ्यावे लागत आहेत अशा अनेक समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या समस्येचा डोगर आवासून उभा असल्याने प्राथमिक शिक्षकांनी संघटनेला आंदोलन करण्याची विनंती केली आणि महा.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने ६ ऑक्टोबर २०२५ पासून एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन जिल्हा परिषद चंद्रपूर करण्यासंबंधाने मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी यांना आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. महा.पुरेागामी प्राथमिक शिक्षक समितीचे समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यकार्यकारी सचिव निखील तांबोळी, जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर, जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे, रवि सोयाम, सुधाकर कन्नाके, लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, महिला मंच सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, महिला मंच कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, महिला मंच कोषाध्यक्ष लता मडावी, महिला मंच उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर, महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here