Home चंद्रपूर मुलीच्या वाढदिवसानिमित्त केले सिन्दुर वृक्षाची लागवड-मुलीच्या वाढदिवसाचे निसर्गदायी सेलिब्रेशन

मुलीच्या वाढदिवसानिमित्त केले सिन्दुर वृक्षाची लागवड-मुलीच्या वाढदिवसाचे निसर्गदायी सेलिब्रेशन

155

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

राजुरा -मूळचे राजुरा येथील रहिवासी असलेले प्रा. प्रशांत रागीट यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथील शिवाजी विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय येथे एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या कनिष्ठ महाविद्यालय चे प्रा. प्रशांत रागीट यांनी आपल्या मुलीच्या चौथा वाढदिवसानिमित्त कनिष्ठ महाविद्यालय येथे सिन्दुर वृक्षांची लागवड करून झाडांचे पालकत्व स्वीकारले. वृक्षसंवर्धनाचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरला.
प्रशांत रागीट यांनी सांगितले की, मुलीच्या वाढदिवशी फुगे, केकपेक्षा निसर्गासाठी काहीतरी करणे महत्त्वाचे वाटले. झाडे लावणे हे एक पाऊल असले तरी त्या झाडांचे संगोपन हे खरे कर्तव्य आहे. मी माझ्या मुलीसोबत या झाडांचाही पालकत्वाचा स्वीकार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वृक्षारोपणाचा उद्देश विद्यार्थ्यांना, ऑपरेशन सिन्दुर ची प्रेरणा तसेच प्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध हवा, आणि निसर्ग स्नेही शिक्षण मिळावे हाच असून, शाळेच्या परिसरात हिरवळ वाढवून एक सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रसंगी संस्थेचे सचिव,लांबट , प्राचार्या कु.ज्योती मोगरे, प्रा. अमोल पोले, प्रा.मीनाक्षी ठेंगणे, प्रा.जया भोयर, प्रा.मेघा वाढई, प्रा.स्नेहल डांगे, महेश ढोरे व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here