


धरणगाव : पी डी पाटील सर
धरणगांव – शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त धरणगाव येथील गुजराथी विसामोड समाजात यावर्षीही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जोरदार पावसाच्या सरींमध्येही मोढेश्वरी मातेंची भव्य मिरवणूक रथावरून भक्तिभावाने काढण्यात आली.
गुजराथी गल्ली येथे नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम, दैनंदिन आरत्या, गरबा-रास आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण उत्साहवर्धक व भक्तिमय बनले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी धीरज गुजराथी, मिहीर कापडिया, सचिन शहा, सुनील शहा, विक्रम जोशी, नयनभाई गुजराथी, राजेंद्र भाई गुजराथी, यश शहा व दिलीप भाई शहा तसेच गुजराथी विसामोड समाज युवक मंडळ, धरणगाव यांनी परिश्रम घेतले.
–















