Home लेख काय बिघडले, रांझाच्या पाटलाने एखादी बाई …..!

काय बिघडले, रांझाच्या पाटलाने एखादी बाई …..!

259

 

 

 

 

 

 

अजित पवारांनी महिला अधिकारी वर दादागिरी केली.इतके तर खाजगी नोकरावर सुद्धा करता येत नाही. “तुझी इतकी हिंमत कि तू मला फोन करायला सांगते. मी तुझ्यावर कारवाई करणार! माझा चेहरा पाहायचा आहे का तुला? माझा आवाज ओळखला नाही का?मी अजित पवार बोलतोय.डेप्युटी सीएम.”
असे जर हॉटेल मधे काम करणाऱ्या नोकराला मालक बोलला असता तर तो तेथेच उस्फटून पडला असता. “असशील तू मालक आणि मी नोकर. पण इतकी मुजोरी, दादागिरी खपवून घेणार नाही.चोरी तू करतोस. मी कानाडोळा करतो. म्हणून तू श्रीमंत झालास. तरीही तू माझ्यावर खेकसतोस. तुला जेलमध्ये पाठवल्याशिवय थांबणार नाही. “असे घडले आहे. छगन भुजबळ बाबतीत. सचिवाचा अपमान केल्यावर तो विष्णुगुप्त सारखा म्हणाला होता. “मी तुला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. “खरोखरोच भुजबळांना २६ महिने जेलमध्ये सडवले.सुटल्यावर म्हणाले, “आता पुन्हा दादागिरी नाही.”

असे करण्यासाठी त्या अपमानित माणसामधे विष्णुगप्त जागा झाला पाहिजे. जेंव्हा एक नोकर चाणक्य बनतो आणि चोरांच्या साम्राज्याला सुरंग लावतो तेंव्हा तो खरा मर्द असतो. एरवी किडा मकोडा सारखेच. मालकापुढे काटकोनात वाकले कि वेदना होत नाही. संवेदना होत नाही.
अजित पवार नावाचा एक माणूस ज्याला शरद पवार यांनी पुतण्या म्हणून मोठा केला. त्याच पुतण्याने घबाड तर भरलेच पण काकांना सुद्धा दगा दिला. म्हणे, माझ्या काकांनी मला मुख्यमंत्री होऊ दिले नाही. नाहीतर आता माझे चोवीस साखर कारखाने राहिले असते. आता तोच माणूस महाराष्ट्र चाखतो आहे. तरीही उष्टे चोखणारी पिलावळ म्हणते, “जय जय महाराष्ट्र माझा!”

चक्क महिला टिव्ही वर येऊन म्हणाल्या, “आमचे दादा नेहमी असेच बोलतात. त्यांचा आवाज असाच आहे. आमचे दादा असेच वागतात. त्यांचा स्वभाव असाच आहे. आम्ही आनंदाने सहन करतो. तर त्यात काय वाईट घ्यायचे? तुम्ही आता महाराष्ट्रात नोकरी करायला आले तर येथील नेत्यांना समजून घेतले पाहिजे. येथे आम्ही रेती माती निधीची चोरी केली तर मधेच तोंड घालू नये. नाहीतर तुमची नोकरी जाऊ शकते. तुमची इमानदारी केरळ मधे चालेल. येथे महाराष्ट्रात नाही चालणार. आम्ही आजपर्यंत असेच वागत आलो आहोत. कोणीच आडवा आला नाही नाही. आला तर आम्ही त्याला आडवा पाडतो. आम्ही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार लपवू शकतो आणि तुम्ही आम्हाला दोन चार डंपर मुरुम साठी चोर ठरवता का? ”
मराठी महिला ज्यांना आदराने, नाईलाजाने माय माऊली म्हणावे लागते, स्री दाक्षिण्य म्हणून ताई म्हणावे लागते, त्या सुद्धा दादाचे असेच समर्थन करीत असतील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निती विरोधात चाललेले आहे. या महिला त्या काळात असत्या तर यांनी रांझाच्या पाटलाचे समर्थन केले असते. “काय झाले पाटलांनी एखादी बाई भोगली तर!”

देवेंद्र फडणवीस, तुमचा फोटो पाहिला. पेपरमधे, गणपतीला नमस्कार करतांना. तुम्ही तर विष्णुगुप्त आर्य चाणक्य चे वारस आहात. शेंडी असेलच. जानवे असेलच. मुंज घातली असेलच. उपनयन केले असेलच. आणि शिवाय गणपतीने बुद्धी पण दिली असेलच. तर थोडी नितीमत्ता सुद्धा मागून घ्या. नसेल तर!

देवेंद्र फडणवीस, मतासाठी तुम्ही महिलांना, लाडकी बहिण म्हणून पंधराशे रूपये खिरापत वाटली. म्हणे आमचे बहिणीवर प्रेम आहे. तर मग ही केरळची महिला महाराष्ट्रात नोकरी करीत आहे, ही तुमची बहिण नाही का? तिच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे लक्षण करण्याची जबाबदारी तुमची नाही का? तुम्ही आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वंदन करतांना मी पाहिले. शिवाजी राजांनी त्या रांझाच्या पाटलाचे हात छाटले होते. तुम्ही या बारामतीच्या सरदाराचे पद छाटले पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कडे आशाळभूत नजरेने पाहात आहे. आमचा देवाभाऊ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीचे रक्षण करण्यासाठीच मुख्यमंत्री बनलेला आहे. आणि जर तुम्ही सुद्धा म्हणाले कि,”आमचे दादा फक्त असे म्हणाले. पण अजून तरी तसे काही केले नाही. जर केले असते तर मी कारवाई केली असती. जर कुठे अन्यत्र ठिकाणी केले असेल तर माझ्या कानावर आले नाही. मी तरी पाहिले नाही.”
म्हणून मी महाराष्ट्र राज्यातील रावण, अहिरावण, महिरावण, वाली यांना सुचवतो कि, महिलांचा अपमान, अत्याचार, बलात्कार करतांना देवाभाऊंना बोलवून समक्ष उभे करा. जेणेकरून त्यांना दिसले पाहिजे. कि हा काय प्रकार चालू आहे?

 

 

 

 

 

 

 

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच ९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here