Home महाराष्ट्र वडूज येथे पैगंबर जयंती (ईद-ए- मिलाद ) उत्साहात साजरी  मुल्ला मस्जिद ट्रस्ट...

वडूज येथे पैगंबर जयंती (ईद-ए- मिलाद ) उत्साहात साजरी  मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लीम समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन  एकतेचा संदेश देत तिरंगा ध्वजासह शहरातून मिरवणूक

209

 

*सातारा ,खटाव, प्रतिनिधी: नितीन राजे (9822800812)*

वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा.येथे इस्लाम धर्माचे प्रेषित मुहंमद पैगंबर जंयती ( ईद-ए- मिलादुन्नबी ) उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लीम समाजातर्फे विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजीक ऐक्य आणि सद्‌भावनेचे प्रतिक असणाऱ्या
हजरत मुहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनाला पंधराशे वर्ष पुर्ण होत आहेत . हा साजरा होणारा पवित्र दिवस मुस्लीम बांधवासाठी अत्यंत महत्वाचा आहे . या दिवशी मुहमंद पैंगबर यांची शिकवण , त्यांचा त्याग , सत्य करुणा , मानवता आणि प्रेमाचा संदेश स्मरणात ठेवला जातो.
मुल्ला मसजीद अहले सुन्नतवल जमात मस्जिद मध्ये अंत्यत भक्तीमय वातावरणात मसजीदचे मौलाना तोसीफ रजवी यांनी धार्मीक तकरीर (प्रवचन ) केले व मुहमंद पैगंबरांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली.
येथील मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने सकाळी १० वाजता वडूज शहरातून मिरवणूक ( जुलूस ) काढण्यात आली . यावेळी मिरवणूकीत झेंडे घेतलेली लहान मुले तसेच देशाचा स्वाभीमान तिरंगा ध्वजही मिरवणूकीचे आकर्षण ठरत होती . यावेळी धार्मीक गीते सादर करण्यात मिरवणूकीस मुल्ला मसजीद अहले सुन्नत वल जमात मशिदीपासून प्रारंभ झाला . बाजारचौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक , बसस्थानक , हुतात्मा स्मारक चौक , मुख्य बाजार पेठ मार्गे ही मिरवणूक पुन्हा मशिदीजवळ आली . यावेळी खटावचे हापीज शमशुद्दीन , मायणीचे हापीज मुश्ताक , मुसांडवाडीचे हापीज शाहीद, कणसेवाडीचे मौलाना सलीमभाई यांची उपस्थिती होती . मिरवणूकीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख , नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे , भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल माळी , उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव , मार्केट कमेटीचे उपसभापती विजय शिंदे , मा. नगरसेवक वचन शहा , विकल्प शहा ,खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन परेश जाधव , माजी नगरसेवक निलेश गोडसे ,शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष युवराज पाटील , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अँड . विनोद शिंदे ,राजेंद्र कुभार , संजय काळे , शेखर म्हमणे ,डॉ. हेमंत पेठे , संकेत म्हामणे ,सुभाष येवले , जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य सचिव प्रा. नागनाथ स्वामी ,विकास शेटे , राहुल म्हामणे ,महेश खडके ,रमेश पोतदार , राहुल सजगणे , अमित गाढवे ,सुहास शहा , विशाल टाकणे ,व्यापारी गणेश मंडळ , शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ , व मोरया गणेशोत्सव मंडळाचे सदस्य यांनी सदिच्छा भेटी दिल्या .
त्यानंतर संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत समाजातील ४५ लहान मुला – मुलींनी मुस्लीम धर्मातील पवित्र कुराण शरीफ मधील आयत व सुरे पठण , व्याख्याने , नात शरीफ , बयानात सादर करणेत आली. यावेळी हजरत सिद्धीलाल शाहबाबा दर्ग्यात सलाम पठण, चादर शरीप व ग्रंथ पठण करण्यात आले व सर्वासाठी दुआँ मागण्यात आली. सहभागी सर्व, मुलांना मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लीम समाजा शैक्षणिक साहित्य भेट वस्तु देण्यात आल्या . यावेळी वडूज मधील अबालवृद्ध, जेष्ठ व तरुण वर्ग , महिला व बालगोपाळासह सर्व मुस्लीम समाज बांधव यांची प्रमुख उपस्थित होते. मस्जीद व घरांना यावेळी पताका , झेंडे व विद्यूत रोशनाई करण्यात आली होती .
कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी खाँजा गरीब ग्रुप, हजरत सिद्धीलालशाह ऊरुस कमेटी, के.जी.एन. ग्रुप, रजा ग्रुप यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान बाजार पंटागणामध्ये मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले .वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता .

चौकट ..
*हिंदू – मुस्लीम ऐक्याच्या सामाजीक सलोख्याचे दर्शन ..

* *गणेशोत्सव व ईद -ए – मिलाद कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणाने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शुक्रवार ऐवजी रविवारी शहरातून जंयतीची मिरवणूक काढण्यात आली .यावेळी अनेक हिंदू समाज बांधवानी मिरवणूकी सोबत उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या व हिंदू -मुस्लीम ऐक्याच्या सामाजीक सलोख्याचे दर्शन घडविले . तर देशाभिमान अंगी बाळगत या मिरवणूकीत तिरंगाही फडकल्याने शहरात सामाजीक ऐक्याचे कौतुकही केले जात होते**

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here