Home महाराष्ट्र शिक्षक दिनी “शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ” निलेश पाटील यांना आदर्श शिक्षक...

शिक्षक दिनी “शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ” निलेश पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान !… पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते : निलेश धर्मराज पाटील ( मुख्याध्यापक )

252

 

प्रतिनिधी – पी डी पाटील सर

जळगांव – जळगांव येथे ५ सप्टेंबर, २०२५ भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्त व शिक्षक दिन निमित्ताने आमचे लहान बंधू जिल्हा परिषद थोरगव्हाण, ता.यावल शाळेचे उपक्रमशील तथा आदर्श शिक्षक व प्र. मुख्याध्यापक निलेश धर्मराज पाटील सर यांना शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा निमीत्ताने जळगावचे आमदार राजू मामा भोळे, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव सिताराम पाटील, ग.स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, संचालक महेश पाटील, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, यांच्याकडून सन्मानपत्र व लेखणी देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू-भगिनींना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी खान्देश माळी महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश ओंकार महाजन व वत्सलाबाई महाजन, पुष्पा निलेश पाटील तसेच नातलग व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश पाटील सरांना यापूर्वी देखील सामाजिक – शैक्षणिक संघटनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय, खान्देशस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे सर्व मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here