Home चंद्रपूर नलफडी केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

नलफडी केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

109

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

राजुरा : नलफडी केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर २०२५) रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मूर्ती येथे उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मंगलाताई गेडाम यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रसिकाताई शेरकी अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र प्रमुख नारायण तेल्कापल्लीवार यांनी प्रास्ताविकातून शिक्षण परिषदेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी म्हणून अनिताताई डंबारे, सुरेश उमरे व आशिष बहादुरे उपस्थित होते.

या वेळी मूर्ती शाळेतून तयार करण्यात आलेल्या इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान विषयावरील ‘बालसंग्रह’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालनाची जबाबदारी विद्यार्थिनी वंशिका बावणे (वर्ग ७) व स्वरा वडस्कर (वर्ग ५) यांनी आत्मविश्वासाने पार पाडून सर्वांचे लक्ष वेधले.

रामरतन चापले व संदीप कोंडेकर यांनी दत्तात्रय वारे यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच विरेन खोब्रागडे व मनीष मंगरूळकर यांनी British Council Rhymes/Poems सादर करून शिक्षकांना कृतीयुक्त व आनंददायी शिकवणुकीचा अनुभव दिला.

गटशिक्षणाधिकारी मंगलाताई तोडे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करून शिक्षकांना समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिक्षकांसाठी स्वतंत्र गट चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. आभारप्रदर्शन मुख्याध्यापक मनीष मंगरूळकर यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रमुख नारायण तेल्कापल्लीवार, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here