


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सौ. हर्षदा अजित शिर्के -पाटील (भाटकी) यांची सातारा जिल्हा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी सौ. रेश्मा चव्हाण – पाटील उपाध्यक्षपदी कांताताई गोळे-पाटील, खजिनदार स्वाती जाधव पाटील, संघटकपदी वैशाली उमेश काटकर-पाटील, संपर्कप्रमुखपदी सौ. प्रतिमा बापूराव कोळेकर-पाटील संचालकपदी सौ. शितल योगेश खाडे-पाटील, सौ धनश्री सयाजी लोखंडे- पाटील, आणि सौ.संध्याराणी धनंजय माने-पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या. तर नूतन अध्यक्षपदी अमित शिंदे पाटील (पाटण), कार्याध्यक्षपदी विनोद थोरात- पाटील तसेच सरचिटणीस म्हणून महादेव साठे-पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या.
.वरील निवडीमुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांच्यामध्येउत्साहाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारी पदग्रहण व मार्गदर्शन सोहळा मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र, सातारा येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, गाव कामगार पोलीस पाटील- संघाचे राजध्यक्ष बाळासाहेब शिंदे -पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघांचे पदाधिकारी व सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील,प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर, दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण दराडे, म्हसवडचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे व महसूल अधिकारी व भाटकी ग्रामस्थांनी अभिनंदन केले
यावेळी सौ. हर्षदा शिर्के बोलताना म्हणाल्या “पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर शासन पातळीवर तोडगा निघावा यासाठी मी माझ्या कार्यकारिणी सोबत अहोरात्र प्रयत्न करणार आहे.जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस पाटील यांचा विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे,” असे निवडीनंतर त्या म्हणाल्या.














