


*अंबाजोगाई-* प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्याधर पंडीत सर,स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण दादा कोदरकर. शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर,उपमुख्याध्यापक शैलेश कंगळे सर पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे हे उपस्थित होते. या कार्यशाळेत मुर्ती बनविण्यासाठी कलाध्यापक विद्याधर पंडीत व उमेश डोंगे यांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दोन दिवसांची आयोजित करण्यात आली होती.
पहिल्या दिवशी मूर्ती कशी तयार करायची याविषयी उमेश डोंगे सरांनी मार्गदर्शन केले व प्रास्ताविका मध्ये सांगितले कि.आपण गणपती बाप्पाला घरात मोठ्या आनंदाने आणतो. पण जर आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्या, तर त्या पाण्यात न विरघळता नद्या आणि तलाव घाण करतात, जलचरांना त्रास देतात.
याउलट शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि निसर्गाचे रक्षण करतात.
आज आपण ठरवू या – “गणपती बाप्पा आपलेही, निसर्गाचाही बाप्पा आपलाच!”
इको-फ्रेंडली मूर्ती करून आपण परंपरेचा मान राखू आणि पृथ्वीचेही रक्षण करू.
या कार्यशाळेत एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व बॉम्बे क्ले पासून गणेश मूर्ती
साकारल्या.
या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेश कंगळे,पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे, अभ्यास पुरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे,कलोपासक मंडळ प्रमुख अनुराधा राजंणकर,उमेश डोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.














