Home महाराष्ट्र धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !… प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी

163

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव: शहरातील माळीवाडा आणि मढी परिसरात सध्या मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून विशेषतः एका हिंसक गाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही गाय सायकलस्वार आणि मोटरसायकलस्वारांवर यांच्यावर थेट हल्ला करत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
या गाईने नुकतेच एका लहान मुलाला सायकलसकट पाडून जखमी केले आहे, ज्यामुळे त्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले, वृध्द रस्त्यावरून एकटे जाण्यास घाबरत आहेत. ही गाय मोटारसायकल किंवा सायकल दिसताच त्यांच्या मागे धावते आणि शिंगांनी हल्ला करते. यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मोकाट गाईचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी विनंती करण्यात येत आहे. जर यावर लवकरात लवकर उपाययोजना केली नाही, तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here