


कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, आम्ही भारतीय महिला मंच आणि समविचारी संघटनाच्या वतीने हर घर तिरंगा… हर घर संविधान… अभियाना अंतर्गत… भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिकांना 50 हजार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला. यातील पहिला भाग म्हणून 15 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर येथे भारतीय तिरंगा व भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून पहिल्याच दिवशी पंचवीस हजार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले.
प्रत्येकांच्या घरावर तिरंगा लावण्याबरोबरच भारतीय संविधानावर चालणाऱ्या भारतीय नागरिकांच्या प्रत्येकांच्या घरात भारतीय संविधानाचे वाचन होणे आवश्यक आहे ही भूमिका घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिक आपल्या हातात भारतीय तिरंगा घेऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनिल म्हमाने, सुरेश केसकर, ॲड. करुणा विमल, मदन पवार, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली. विमल पोखर्णीकर, अनिता काळे, लाला नाईक, विश्वासराव तरटे, महादेव चक्के, अर्हंत मिणचेकर, आदित्य म्हमाने यांच्यासह संविधानप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.













