


प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगाच्या मानधनात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन व शेतकरी संघटनेच्या वतीने (दिनांक 24 जुलै गुरुवार) रोजी सकाळी 11 वाजता भर पावसात दोनतास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.चक्काजाम आंदोलमुळे दोन्ही कडील वाहतूक थांबली होती.शेतकऱ्यांचां सातबारा कोरा करा या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे बचु कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड शहरातील महाराणा प्रताप चौक परळी नाका येथे भर पावसामध्ये दोन तास शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.सदरील आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बंडू सोळंके,तालुका अध्यक्ष कृष्णा भोसले,युवा तालुकाध्यक्ष माऊली लंगोटे,संपतराव निरस,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पोले, विलास भालेराव,शिवाजी जाधव यांच्यासह शेतकरी,कष्टकरी,दिव्यांग,शेतमजुर मेंढपाळ,मच्छीमार कामगार, ग्रामपंचायत कामगार आदींनी सहभाग नोंदवला याप्रसंगी शेतकरी दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी जाहीर करा शेतकऱ्याचा “सातबारा कोरा” करा दिव्यांगाणा सहा हजार रुपये मानधन सुरू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा आदी प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा अशा घोषणा देण्यात आल्या.शेतकऱ्यांना राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी कर्जमुक्तीच्या संदर्भात दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान गंगाखेड पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता














