


संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378
नागभीड :-चंद्रपूर जिल्हातील नागभीड येथील उपक्रमशील शिक्षिका प्रा. रुपाली पाथोडे यांची केंद्र शासनाच्या सी. सी. आर. टि. (सेन्टर फॉर कल्चरल रिसोअर्सेस अँड ट्रेनिंग ) या संस्थेद्वारे आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. प्रशिक्षण २४जुलै ते १३ ऑगस्ट 2025 दरम्यान गुवाहाटि, आसाम येथे होणार आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की प्रा. रुपाली विलास पाथोडे हे चंद्रपूर जिल्यातील नागभीड येथील जनता कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असुन त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपक्रम राबाविले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून सी सी आर टि प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.
सी सी आर टि प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शालेय शिक्षणात भारतीय कला, संस्कृती, लोकपरंपरा, नाट्य, हस्ताकला आदींचा प्रभाविपणे वापर करुन शिकविणे हा असुन देशभरातील निवडक शिक्षकांना यासाठी संधी दिली जाते.
या प्रशिक्षणासाठी राज्यातून नऊ शिक्षकांची निवड झाली आहे. प्रा. रुपाली पाथोडे हे विदर्भातील जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणार असल्याने हि विदर्भासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, शिक्षणाधिकारी चंद्रपूर, गट शिक्षणाधिकारी पं स. नागभीड, शिक्षनविस्तार अधिकारी पं. स. नागभीड, जनता शिक्षण संस्था नागभीडचे अध्यक्ष डॉ. अमीर धमानी, सर्व पदाधिकारी, संचालक महोदय, जनता कन्या कनिष्ठ महाविद्यालय नागभीड चे प्राचार्या रंजना तरारे मॅडम सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व मित्रपरिवार तसेच सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.














