Home नागपूर उच्च प्राथमिक कोलार शाळेची सहल संपन्न

उच्च प्राथमिक कोलार शाळेची सहल संपन्न

175

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.31जानेवारी):-उच्च प्राथमिक शाळा कोलारची शालेय शैक्षणिक सहल नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र ,महाराज बाग व दीक्षाभूमी या ठिकाणी आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी या सहली दरम्यान रमण विज्ञान केंद्रात विज्ञानाचे विविध प्रयोग स्वतःच्या हाताने करून पाहिले. त्याचप्रमाणे थ्री डी शो. एस. ओ .एस .शो व प्लॅनेटोरियम शोच्याद्वारे पृथ्वीची निर्मिती व त्याची प्रक्रिया याविषयीची वैज्ञानिक माहिती आत्मसात केली 

 विज्ञान हे जीवनाला नवे तत्त्वज्ञान प्राप्त करून देते. आपल्या जीवनातील अंधश्रद्धा यावर मात करते.नवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे आपल्या संविधानाचे कर्तव्य आहे.म्हणून उच्च प्राथमिक शाळा कोलार यांनी सी. वी. रमण केंद्र नागपूर येथे शैक्षणिक सहल आयोजित केली होती.

 त्याचप्रमाणे पर्यावरणाचे महत्त्व व वन्यजीव यांच्या विषयीची प्रेम जाणिव व्हावी म्हणून महाराज बाग येथे विद्यार्थ्यांना नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे वैशिष्ट्ये समजून घेतले .वेगवेगळ्या झाडांची माहिती त्यांना समजून आली. तसेच विविध खेळांमधून त्याने आपले मनोरंजन केले. त्यानंतर दीक्षाभूमी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली.दीक्षाभूमीच्या घुमटात जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुषंगाने लावलेल्या भीती चित्राचे वाचन केले. त्यानंतर बाहेरील असलेल्या पिंपळ वृक्ष, संविधान स्तंभ यांचे सुद्धा निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांनी दीक्षाभूमी परिसरात आपले छायाचित्र काढले. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून एक सामूहिक फोटो घेण्यात आला.

या शालेय शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल अशी आशा सहलाचे आयोजक संदीप गायकवाड यांनी व्यक्त केले.या सहलीला मुख्याध्यापक आशा दुमोरे,वनिता ढाबरे,सुनिता हिंगे ,ताराबाई पाटील,कुंता राऊत सहभागी झाल्या होत्या.अत्यंत आनंदात ही सहल संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here