Home अमरावती समाज प्रबोधनकार प्रशांत दामले समाज रत्न पुरस्काराने सन्मानित 

समाज प्रबोधनकार प्रशांत दामले समाज रत्न पुरस्काराने सन्मानित 

323

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)

अमरावती(दि.31जानेवारी):-दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील लेखक तथा समाज प्रबोधनकार प्रशांत दामले यांना त्यांच्या कार्याबद्दल साहित्यरंग साहित्यमंच आयोजित नारायण सुर्वे ग्रंथालय नाशिक द्वारा पुरस्कार सोहळा व कवी संमेलनात उत्कृष्ट समाज प्रबोधन करत असलेले प्रशांत दामले यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक रविकांत शार्दुल, कवी सुभाष उमरकर, हर्षवर्धन जाधव, इंदिरा जाधव, अश्विनी सांगळे, सुशील कुमार शिंदे युवा वक्ता व आयोजक यांच्या उपस्थितीत प्रशांत दामले यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बहारदार पुरस्कार सोहळा व कवी संमेलनामध्ये अंगुलीमाल मायाबाई उराडे चंद्रपूर, जेष्ठ साहित्यिक नागोराव सर नागपूर यांच्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून कवी साहित्यिकांनी हजेरी लावली.

प्रबोधनकार प्रशांत दामले यांना समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल रीना दामले, विशाल पडघामोल, राहुल वानखडे अभिनेते, गौरव पळसपगार, तुषार पडघामोल, गणेश चौधरी सर व समता नवयुवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here