Home नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमने केले इंदोरा चौकात मनुस्मृतीचे दहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमने केले इंदोरा चौकात मनुस्मृतीचे दहन

149

 

नागपूर, – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने नागपूर शहरातील इंदोरा चौक येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष राजेश लाडे यांच्या नेतृत्वात मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृती दहन हाच स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी देशातील सर्व जातींच्या महिलांना माणूस म्हणून जगण्याचा व समानतेचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. मनुस्मृती दहन हा दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिवस आहे. या दिवशीच स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे लाडे म्हणालेत. प्रसंगी अनिल नगराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माणसाला हीन वागणूक देणाऱ्या या ग्रंथाचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून आपल्याला न्याय हक्क मिळवून दिले. मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती शिवाजी महाराजांचाही राज्याभिषेक नाकारला होता. मनुस्मृतीचे दहन बाबासाहेबांनी करून आपल्याला न्याय हक्क मिळवून दिला असल्याचे नगराळे म्हणालेत.

यावेळी गोपाल राजवाडे, प्रभाकर सोमकुवर, रजनीगंधा वाघमारे, महेन्द्र बोरकर, मुलचंद मेहर, नरेश खडसे, दिपा गावंडे, कल्पना द्रोणकर, शारदाताई रामटेक, निलेश खोब्रागडे, अभिजीत सांगोडे, गौतम अंबादे, निशाद इंदूरकर, संदीप मेश्राम, आशिफ शेख, सतीश पाली, चेतन तरारे आणि इंद्रपाल वाघमारे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here