Home चंद्रपूर आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते २५ कोटी ४६ लक्ष रुपये निधीच्या विविध...

आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते २५ कोटी ४६ लक्ष रुपये निधीच्या विविध कामाचे भूमिपूजन संपन्न.

238

 

चिमूर- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात २५ कोटी ४६ लक्ष रू. कामा चे भूमीपूजन संपन्न झाले.
तहसील कार्यालय मध्ये झालेल्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, सहाय्यक जिल्हा निबंधक अंकिता तांदळे, तहसीलदार राजमाने, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे उपस्थित होते.

दुय्यम निबंधक श्रेणी-१ प्रशासकीय इमारत, चिमुर कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे २१४.२६, चिमूर येथील तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे. ३५०,००, चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे. १४३१.६३, चिमूर येथे २९ तलाठी कार्यालय बांधकाम करणे ४३५,००, कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे विदर्भ पटवारी संघाचे वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज ची मूर्ती भेट सन्मानित करण्यात आले.

संचालन एकनाथ थुटे यांनी केले.
तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपविभागीय अधिकारी उपगलनवार, भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर, श्रेयस लाखे, अमित जुमडे, नरेंद्र हजारे, शैलेश पाटील, संदीप पिसे, विनोद चोखरे, योगेश नाकाडे, अर्जुन पाटील थुटे, करण चावरे, राजु बोडणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here