Home लेख भाजीपाला सहज पिकतोय का? बाजारात दिसतो तेवढं सोपं आहे काय!

भाजीपाला सहज पिकतोय का? बाजारात दिसतो तेवढं सोपं आहे काय!

437

 

शेती ही भारतीय परंपरा आहे. आणि भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो हे सर्वांच्या परिचयाचे आहे. भारतात मुख्यत्वे गहू तांदूळ कापूस ऊस डाळवर्गीय बाजरी मका सोयाबीन चहा कॉफी भाजीपाला वरील सर्व पिके हे भारतातील अर्थव्यवस्थेसाठी आणि अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचा उत्पादनातील वाटा आणि आहारातील महत्त्व हे दोन्ही देशांच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात. यात शेतीतील पिके बाजारात दिसते तेवढं सोपं नसते. खूप कष्ट खूप मेहनत करावी लागते आणि हे कष्ट दिसत नसते. भाजीपाला बाजारात दिसतो सहजरीत्या त्याची खरेदी केली जाते परंतु त्या मागची होणारी मेहनत कोणत्याच खरेदीदाराला दिसत नाही. परिवारातील लहान मोठे सदस्य यांचा मोलाचा सहभाग भाजीपाल्याच्या शेती मध्ये असतो. भाजीपाला महागडा झाला तर सर्व जनता ओरडते. परंतु ज्या दिवशी स्वस्त भाजीपाला असतो त्या दिवसाला शेतकऱ्याला एक टन पोतेच्या पोते भरून बाजारात भाजीपाला फेकून घरी खाली हातानी परत जावं लागते. तेव्हा शेतकऱ्याला विचरणाला कुणी नसतो. शेतकऱ्याची विचारपूस करणारा कोणताच नेता किंवा सक्रिय कार्यकर्ता नसतो. आज पर्यंत शेतकऱ्यांना न्याय देणारा राजकर्ता बघायला मिळालाच नाही, कधी शेतकऱ्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले नाही, आणि स्वतःच्या प्रचारासाठी गावागावात मोठ मोठ्या ट्रॅव्हल्स, चारचाकी वाहन पाठवून सभेला बोलावले जातात. जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हाच माझा शेतकरी बांधव म्हणून ऐकायला मिळते. म्हणून एक शेतकरी म्हणून विचार आला भाजीपाला सहज पिकतोय का? बाजारात दिसतो तेवढं सोपं आहे काय! शेतकऱ्याच्या साथीला कोणताही राजकर्ता नसून फक्त आणि फक्त शेतकरी बांधव आहे.

रामभाऊ मदनकर शेतकरी (रा. अर्हेर नवरगाव ता. ब्रम्हपुरी जी. चंद्रपूर मो. 8806297271)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here