Home महाराष्ट्र वरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर !

वरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर !

330

 

वरूड तालुका प्रतिनिधी :
वरूड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू कोहळे, आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस पक्षाची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी वरूड तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.
राष्ट्रवादीत फूट पडून महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये वरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू पाटील कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते वरूड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विवीध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी वरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका अध्यक्ष पदी विजय वडस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका सेवादल प्रमुख पदी रामचंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदी तारेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका युवक प्रमुख निलेश गोमकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी वरुड विधानसभा प्रमुख युवक पदी ऋषिकेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसुचित जाती जमाती वरुड प्रमुखपदी सुधाकर मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड शहर प्रमुख देवचंद बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड शहर सरचिटणीस पदी भारत खासबागे यांची नियुक्ती करण्यात आली.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये वरूड तालुक्यातील सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी सह नव्या आव्हानांना पेलवत, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करून त्याचबरोबर मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या सामान्य गरजा ते इतर महत्त्वांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी आमदार देवेंद्र भुयार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळू कोहळे पाटिल यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी वरूड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here